top of page
WhatsApp Image 2024-08-01 at 2.59_edited.jpg

Plastic Collection – Success Story of Kalmadi School, Erandwane, Pune

प्लास्टिक संकलन – यशोगाथा कलमाडी स्कूल एरंडवणे,पुणे

1)प्लास्टिक संकलन या उपक्रमाची सुरुवात करण्याची कल्पना कशी सुचली? 

उत्तर- पर्यावरणातील वाढते प्लास्टिक प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम या बद्दल मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्याची कल्पना  सुचली. आणि ०५/०८/२०२२ या उपक्रमाची सुरुवात Thum creative Paryavaran Dakshta Kruti Manch या संस्थे सोबत करण्यात आली. सध्या आमची शाळा जनवाणी ह्या संस्थे सोबत हा उपक्रम राबवत आहेत.  

2)प्लास्टिक संकलन या उपक्रमा मागचा मुख्य उद्देश काय होता?

 

उत्तर - विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजवणे हा मुख्य उद्देशय होता .आपली तसेच आपली एक छोटी-शी कृती मोठा बदल करू शकते ही भावना मुलांमध्ये निर्माण करणे. 

 

3)शाळा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांची भूमिका काय होती? 

शाळा प्रशासनाने नियोजन व योग्य मार्गदर्शन केले, शिक्षकांनी समन्वयक म्हणून काम पाहिले आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संकलन व जनजागृतीची जबाबदारी घेतली. पहिल्या वर्षी ही योजना राबवताना शिक्षकांनी मुलां मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सत्रे घेतली तसेच वर्गप्रमुख मुले व मुली पण प्रत्येक महिन्यातील वारांप्रमाणे सगळ्या वर्गात जाऊन मुलांना प्रेरित करत होते.  

4) प्लास्टिक संकलन कसे केले जाते? अंमलबजावणी (वर्ग, परिसर, घरे इ.) 

मुल आपल्या घरात प्लास्टीक bottles/ प्लास्टिक कंटेनर / खेळणी इत्यादि साहित्य घरी गोळा करतात आणि प्रत्येक महिन्यातील ठरलेल्या चार दिवसात शाळेत घेऊन येतात. तसेच वर्गातील जमा झालेले प्लास्टीक रॅपर / पेन /रिफील गोळा करून कलेक्शन मध्ये जमा केले जाते .  

5)कोणत्या प्रकारचे प्लास्टिक संकलित केले जाते? 

उत्तर- प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, रॅपर, पॅकेजिंग साहित्य, सिंगल युज प्लास्टिक इत्यादी संकलित केले जाते. 

6) परिणाम 

आतापर्यंत किती प्लास्टिक संकलित झाले आहे? किती विद्यार्थी सहभागी होते? 

उत्तर- आतापर्यंत मोठ्या प्रमाणात (मागील वर्षी ८०० ते १०००किलो) प्लास्टिक संकलित झाले असून इयत्ता ५ ते १० चे जवळपास १५०० विद्यार्थी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत झाली  आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जबाबदारीची भावना वाढली आहे. सामूहिक प्रयत्नातून सकारात्मक बदल घडवता येतो, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. 

7) या उपक्रमामुळे शाळा/विद्यार्थ्यांमध्ये कोणते सकारात्मक बदल दिसले? 

 

उत्तर- विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आणि पर्यावरणपूरक सवयी वाढल्या. आपण दिलेल्या प्लास्टीक ची आता योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाते हे लक्षात आल्यावर संकलन वाढले.  

8) विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये जागरूकता कशी वाढली? 

उत्तर – दर महिन्यातील गोळा झालेल्या प्लॅास्टिक ची नोंद मुलांना ही पाठवली गेली. एक छोटीशी कृती आपले पर्यावरणाचे नुकसान वाचवू शकते हे ही मुलांना लक्षात आले. मुलांचे फोटो whatsapp ग्रुप वर पोस्ट केल्यामुळे पालकांचा  चांगला  प्रतिसाद मिळाला .  

9) पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांची दृष्टी कशी बदलली? 

उत्तर- विद्यार्थी प्लास्टिक टाळण्याकडे, कचरा वर्गीकरणाकडे आणि पर्यावरण संरक्षणाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागले आहेत. ते दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारू लागले आहेत. पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून कर्तव्य आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. छोट्या कृतींमधून मोठा बदल शक्य आहे, हा दृष्टिकोन विकसित झाला. 

10)उपक्रम राबवताना कोणत्या अडचणी आल्या? 

उत्तर- सुरुवातीला सहभाग कमी असणे, प्लास्टिक वेगळे करणे व साठवणूक करणे या अडचणी आल्या.  

11) उपाय काय केले? त्या अडचणींवर कसे मात केली? 

उत्तर - मार्गदर्शन, प्रोत्साहन, सातत्यपूर्ण जनजागृती आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे अडचणींवर यशस्वीरीत्या मात केली.  

12) भविष्यात हा उपक्रम कसा वाढवण्याचा विचार आहे?

 

उत्तर - हा उपक्रम नियमित स्वरूपात राबवणे, शाळेला व परिसराला प्लॅस्टिक मुक्त करणे हे  मुख्य उद्दिष्ट आहे . सध्या आमची शाळा मिशन सिटी चक्र यांच्या सोबत मिळून NO PLASTIC BOTTLES & TIFFIN हा पण उपक्रम राबवत आहे.  ह्या उपक्रमाला पण सगळ्या मुलांचा उत्तम सहभाग व प्रतिसाद आहे. आसपास च्या परिसरातील शाळांमध्ये  जाऊन ह्या उपक्रमाची माहिती देणे व त्यांना पण असे उपक्रम करण्यास प्रवृत्त करणे, हा पुढील विचार आहे.  

धन्यवाद   

सोनाली घोडके  

समन्वयक  

कलमाडी स्कूल 

मो.९८५०३३८५९०

Janwani Logo

Janwani, established in 2006 and now an independent trust supported by MCCIA, aims to make the Pune Metropolitan Region (PMR) the best place to live and work by promoting solid waste management in collaboration with various stakeholders and has achieved significant progress in coverage, segregation, E-waste collection and capacity building.

Social link 

instagram.png

Important links

Mail logo

Contact Us

location icon

Registered Office Address 

Janwani NGO Graphic 424 PX BY 176.jpg

4th floor, Plot no.56, Taur Villa, Shivaji Housing society, S.B.road, Pune, Maharashtra - 411016

bottom of page